मा.श्री.बाळाराम पाटील यांच्या अधिकृत साइटवर तुमचे स्वागत

  • पूर्ण नाव: श्री. बाळाराम दत्तात्रेय पाटील
  • शिक्षण: बी.ए.(पॉलिटिक्स)
  • वडिलांचे नाव: श्री. दत्तात्रेय (तात्या) नारायण पाटील (तीन वेळा आमदार-पनवेल उरण)
  • आई: प्रभावती दत्तात्रेय पाटील
  • राजकीय वारसा: कै. काळोजी हालोजी पाटील (पंजोबा) हे कुलाबा लोकल बोर्डाचे सदस्य होते.
  • विराजमान पदे
    1. विधान परिषद सदस्य (शिक्षक आमदार), महाराष्ट्र राज्य (कोकण शिक्षक मतदार संघ).
    2. अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, कोकण विभाग.
    3. सदस्य, महाविदयालय विकास समिती, रयत शिक्षण संस्थेचे, वीर वाजेकर आर्टस्, सायन्स, अॅण्ड कॉमर्स कॉलेज, फुंडे, उरण.
    4. अध्यक्ष, माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पनवेल.
    5. चेअरमन, कोकण एज्युकेशन सोसायटीचे व्ही. के. हायस्कुल, पनवेल.
    6. अध्यक्ष, रायगड जिल्हा अॅथेलेटिक्स असोशिएशन.
    7. अध्यक्ष, कुस्तीगीर संघटना, रायगड.
  • राजकिय कारकिर्द
    1. सन १९९७ - पनवेल पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान.
    2. सन २००५ - रायगड जिल्हा परिषद सदस्य पदी निवड व नंतर अध्यक्ष.
    3. सन २०१० - शिक्षण व आरोग्य सभापती, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.
  • या कारकिर्दीतील उल्लेखनिय कार्यकर्तुत्व
    1. क्रिडापटूंना दरमहा खुराकभत्ता व प्रवासभत्ता सुरू करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद
    2. रायगडावर विज पडली असता सि.ओ.ना रात्री २.00 वा. घेऊन जाऊन पाहणी करून रातोरात दुरूस्ती करण्याचे आदेश देणारे जिल्हा परिषद अध्यक्ष
    3. चिरनेर जंगल सत्याग्रहामधील हुतात्मे यांचे चित्रशिल्प उभारणी करणे.
    4. शिवथरघळ येथील भक्तांसाठी व समर्थकांसाठी शासकिय निवासस्थान उपलब्ध करणेसाठी २५ लक्ष निधी देऊन निवासस्थान उभारणी करणे.
    5. शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके जन्म स्थानाचे राष्ट्रिय स्मारकाची दुरूस्ती व जतन करणे.
    6. निर्मल ग्रामयोजनांची अंमलबजावणी केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले व सन्मानचिन्ह मिळाले.
    7. वार्षिक कला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणे.
    8. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांची फी ची तरतूद जिल्हा परिषद माध्यामातून करणे.
    9. आर्थिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रूपयांची तरतूद करणे.
    10. आदिवासी विभागाकडून ९९१ आदिवासींचे सामुदायिक विवाह करण्यांची योजना जिल्हा परिषदेच्या माध्यामातून राबविणे.
    11. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढावे म्हणून विविध आस्थापना देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रांच्या फी मध्ये वाढ करून ८ कोटीचे उत्पन्न ५० कोटी पर्यंत वाढविले.
  • शैक्षणिक कार्य
    1. सन १९९९ ला गरिब व होतकरू विद्यार्थ्यांनच्या भवितव्यासाठी नावडे-तळोजे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करून मराठी माध्यमाच्या ०९ विदयालय, इंग्रजी माध्यमाचे ०७ विदयालय, सी.बी.एस.सी. बोर्डाचे ०३विदयालय व ज्युनिअर कॉलेज ०२ अष्या २१ शाखांची उभारणी करून अध्यक्षपदाची धुरा सभांळत गरिब व होतकरू विद्यार्थ्यांनच्या शिक्षणाची सोय केली.
    2. सतत व वेळोवेळी स्पर्धा परिक्षा व क्रिडांचे आयोजन करून उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.
    3. कोकण एज्युकेशन सोसायटीचे दत्तुशेठ पाटील विदयालय, विठोबा खंडाप्पा विदयालय व के.व्ही.कन्या विदयालयाचे चेअरमन पद भुषवत असताना सर्व विदयालय व महाविदयालयांचे शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक व भौतिक प्रगती करणे.
    4. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे रयत शिक्षण संस्थेच्या कोकण विभागाचे विदयमान चेअरमन पदी कार्यरत असून विविध उपक्रमाद्वारे रयत शिक्षण संस्थेचे नाव उंचवण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.
    5. जिल्हा परिषद शाळांच्या अदयावत ईमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून बांधकाम पूर्ण केले.
    6. जिल्हा परिषद शाळांमध्ये ई लर्निंग सुरू करणे व विद्यार्थ्यांमध्ये अक्षर सुधार प्रकल्प राबविणे.
  • सामाजिक कार्य
    1. सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळे अदयावत करण्यासाठी जास्तीत जास्त निधींची तरतूद करणे.
    2. आदीवासीयांसाठी घरकूल योजना राबविले.
    3. आधारकार्डांची योजना राबवून गोरगरिबांना व वयोवृधानां आधारकार्ड मिळवून दिली.
    4. सोशल वेलफेअरच्या माध्यमातून १२०० अपंगाना विनामुल्य साहित्यांचे वाटप केले.
    5. खारघर येथे नो लिकर झोन (दारू बंदी) केली.
  • क्रिडाक्षेत्रातील कार्य
    1. सन २००१ क्रिडा प्रंबोधनी स्थापना करून विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षणाची सोय केली एप्रिल २०१२ मध्ये क्रिडानगरीत बालेवाडी, पुणे येथे झालेल्या निवड चाचणीत एकाचवेळी ६५ विद्यार्थ्यांची निवड झाली. हे सर्व यश संपादन करणारी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद व त्याचे श्रेय आमदार बाळाराम पाटील यांना जाते.
    2. जिल्हया बाहेर राज्यात देशात खेळायला जाणाऱ्या खेळाडूनां विशेष प्राविन्या मिळविणाऱ्या खेळाडूनां शुज व ट्रॅकसूट इ. व प्रवासाची सोय करण्याची तरतूद करणारी जिल्हा परिषद.

आगामी कार्यक्रम

View More Post